जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले; चाचण्या देखील घटल्या

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात केवळ सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 8 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील चोवीस तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एकूण मृत्यूसंख्या 318 वर पोचली आहे. 

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने 6 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 531 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 8 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 49 हजार 374 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात तब्बल 13 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.47 टक्के आहे.