71 नवे बाधित; रुग्णसंख्या सात हजार नजिक
रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना बाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 231 वर पोचली आहे. याशिवाय जिल्ह्यात 71 नवे बाधित रुग्ण सापडले असून एकूण बाधितांची संख्या 6 हजार 903 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. बुधवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 71 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 41 रुग्ण आरटीपीसीआर तर 30 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सापडलेल्या 71 रुग्णांपैकी मंडणगड तालुक्यात 3, दापोली 2, खेड 3, गुहागर 9, चिपळूण 20, संगमेश्वर 6, रत्नागिरी 17, लांजा 7 आणि राजापूर तालुक्यात 4 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 41 हजार 389 नमुन्यांची तापासणी करण्यात आली असून यापैकी 6 हजार 903 नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मागील 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात खेड मधील 1, दापोली 1, संगमेश्वर 1,रत्नागिरी 2 आणि चिपळूण तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 231 जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात 68 झाले आहेत.