रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 31 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा आठ हजार पार पोचला आहे. तसेच नव्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 293 झाली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. कोरोना बाधित रुग्ण सापडण्यासह मृत्यू होण्याचे प्रमाण देखील घटले आहे. मागील 24 तासात केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण संगमेशवर तालुक्यातील आहे.
मागील 24 तासात 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. आता पर्यंत 42 हजार 369 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी 46 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7 हजार 117 जण कोरोनामुक्त झाले असून हे प्रमाण 88. 91 टक्के आहे.