जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दोन हजार पार

चोवीस तासात अवघे 20 कोरोना पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात 20 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आई आहेत. यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह  589 रुग्ण आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 17 आणि ॲन्टीजेन टेस्ट केलेले 3 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. 

बुधवारी 22 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 357 झाली आहे. बुधवारी बरे झालेल्यांमध्ये माटे हॉल, चिपळूण 1, समाजकल्याण मधील 6, घरडा 12 आणि कामथे, चिपळूण येथील 3 रुग्ण आहे.