१३ कोरोना बाधित; दोन दिवसात २७ बाधित रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. चाचणीमध्ये शनिवारी १३ बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ८५ हजार ७८५ झाली आहे. शनिवारी एका बाधिताचा मृत्यृ झाला असून एकूण मृतांची संख्या २ हजार ५४४ झाली आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १६) १४ बाधित सापडले होते, तर दुसऱ्या दिवशी झालेल्या २३१ कोरोना चाचण्यांमध्ये १३ बाधित सापडले आहेत. २१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात चौघांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजवर ८३ हजार १५४ जण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६.९३ टक्के झाले आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे एका बाधिताचा मृत्यू झाला असून मृत्यूदर २.९७ टक्के झाला आहे. जिल्ह्यात ८७ अॅक्टिव्ह असून गृहविलगीकरणामध्ये ६२ तर संस्थांत्मक विलगीकरणामध्ये १३ जणांचा समावेश आहे.