रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संख्या कमी होत असतानाच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 13 पैकी 9 मृत्यू पूर्वीचे व 4 मृत्यू 24 तासातील असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच नव्याने 282 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
नव्याने 282 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 70 हजार 793 झाली आहे. नव्याने सापडलेल्या 282 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 195 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 87 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 70 हजार 793 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 65 हजार 868 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 24 तासात 631 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात नव्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 13 रुग्णांच्या मृत्यूमुळे एकूण मृत्यूची संख्या 2 हजार 33 इतकी झाली आहे. नव्याने नोंद झालेल्या 13 मृत्यूपैकी 4 मृत्यू हे 24 तासातील तर 9 मृत्यू यापूर्वीचे आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर मागील आठवड्यात 2.82 टक्के इतका होता. हा मृत्युदर या आठवड्यात घटून 2.87 टक्क्यांवर आला आहे. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 93. 93 टक्क्यांवर आहे.