जिल्ह्यात कोरोनाने एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात शनिवारी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये नवीन ५ बाधित सापडले आहेत. तर लांजा तालुक्यातील एकाचा कोरोनानो मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी झाली आहे.

कोरोना मुक्तीच्यादिशेने राज्याची वाटचार सुरू आहे. यातच जिल्ह्यात गेल्या करण्यात आलेल्या एकुण १४६ चाचण्यांपैकी नवीन ५ कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे एकुण कोरोना बाधितांची संख्या ८६ हजार ००२ झाली आहे. दिवसभरात २ बाधित बरे झाले एकुण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३ हजार ४३८ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. दिवसभरात आज एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील हा बाधित आहे. त्यामुळे एकुण मृतांची संख्या २ हजार ५५२ झाली असून मृत्यूदर २.९७ टक्के आहे. जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १२ असून गृह विलगीकरणात ११ तर संस्थात्मक विलगीकरणात १ रुग्णा आहे.