रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ दहा बाधित रुग्ण सापडले आहेत. तर या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
शनिवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 77 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 49 हजार 307 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी 77 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आता पर्यंत 8 हजार 516 रुग्णांपैकी 8 हजार 038 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 94.38 टक्के आहे.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही ही मोठी दिलसादायक बाब ठरली आहे. आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 317 बळी गेले आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर 3.73 टक्के इतका आहे.
नव्याने सापडलेल्या दहा रुग्णांपैकी 2 रुग्ण आरटिपीसीआर टेस्ट केलेले तर 8 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. दहा पैकी पाच रुग्ण संगमेश्वर, रत्नागिरी 2, दापोली 1 तर 2 रुग्ण लांजा तालुक्यातील आहेत.