रत्नागिरी:- शिंदे शिवसेनेने सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरचा सर्वाधिक फटका शिवसेना उबाठा गटाला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के शिवसेनेने शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर तर उबाठा गटाला गळतीच लागल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी सुद्धा शिंदे गटाची वाट पकडली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र पक्ष प्रवेशाच्या काही तास अगोदर या तिघांवर पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून हकालपट्टी केली आहे. यामुळे एकंदरीत ऑपरेशन टायगरने ठाकरे गट घायाळ झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारी करत आहे. शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर राज्यात सुरू असून ठाकरे यांना धक्यावर धक्के बसताना दिसत आहेत. सेनेत बंड झाल्यावरही निष्ठावान म्हणून मानल्या जाणाऱ्या राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडली नव्हती मात्र दोन दिवसांपूर्वीच साळवी यांनी ठाकरेंची शिंदे गटाचा रस्ता पकडला. आता त्यांच्या पावलावर गेली अनेक वर्षे जिल्हा सांभाळणाऱ्या सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक तसेच जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी सुद्धा ठाकरे गटाला राम राम केला आहे.
शनिवारी राजेंद्र महाडिक, विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे प्रवेशाला काही तास असताना या तिघांचीही ठाकरे गटाने हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून केल्याचे जाहीर केले. शिवसेना मध्यवती कार्यालयातून सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीचे पत्र काढण्यात आले. यामध्ये तिघांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका करण्यात आला आहे.