रत्नागिरी:- परतीबरोबरच अवकाळी पावसाने निरोप घेतल्यानंतर आता तापमानात ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागला आहे. पुढील दोन दिवस पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील काही दिवस किनारपट्टी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळी तापमान 29 अंश होते. दुपारी 12 वाजता 30 अंश सेल्सियस एवढे नोंदविले. तापमान वाढल्याने ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागला. सध्या निवडणुकांचा कालावधी असल्याने प्रचारासहित उमेदवारी अर्ज भरण्याची वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय तापमान वाढलेले असताना आक्टोबर हिटमुळे कार्यकर्तेही आता घामाघूम होऊ लागले आहेत.