रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकून 15 कोविड रुग्ण हे जीनोम सिकर्वेसिंगमध्ये डेल्टा प्लस व्हेरिअंटचे असल्याचे आढळलेले आहेत. हे सर्व रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आहेत.
आढळलेल्या 15 पैकी नविन तीन रुग्णाची माहिती रविवारी राज्य स्तरावरून कळविण्यात आली आहे. हे तीन रुग्ण जुलै 2021 मध्ये कोविड बाधित म्हणून रत्नागिरी जिल्हयामध्ये उपचार घेत होते. यातील दोन रुग्ण मौजे आंगवली व एक रुग्ण मौजे धामणी तालुका संगमेश्वर मधील असून हे तिन्ही रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झालेले आहेत. १५ रुग्णांपैकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान वुमन्स हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यु झालेला आहे व एका रुग्णाचा मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झालेला आहे परंतु सदर रुग्णाचा आधारकार्ड वरील पत्ता हा रत्नागिरीचा असल्यामुळे त्याची नोंद या जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेली आहे.