रत्नागिरी:– सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 40 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांनी शंभरी पार केली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 14, कामथे 19, गुहागर 5, कळबणी खेड 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 40 रुग्णांशिवाय सकाळी 62 पॉझिटीव्ह आढळले होते. यामुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या 102 झाली आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 658 इतकी झाली आहे
सोमवारी सायंकाळी बरे झाल्याने 30 रुग्णांना घरी सोडण्यात आले, त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 1 हजार 84 झाली आहे. घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांमध्ये घरडा येथील 19, समाज कल्याण 7, कामथे 3 आणि रत्नागिरीतील 1 रुग्णाचा समावेश आहे.