रत्नागिरी:- मंगळवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हा कोव्हिड रुग्णालयात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा 24 वर पोचला आहे.
नव्याने सापडलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण-1 (मुंबई प्रवास इतिहास), शिवाजीनगर जुना फणसोप, ता. रत्नागिरी-1 (विशाखापट्टण प्रवास इतिहास), धामेली कोतवडे, ता. रत्नागिरी-1 (आशा वर्कर), पोलीस वसाहत, ता. रत्नागिरी-1 (पोलीस कॉन्स्टेबल), गोडावून स्टॉप ता. रत्नागिरी-1 (स्टाफ नर्स) यांचा समावेश आहे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण मु.पो. पिसई कुंभारवाडी, ता. दापोली येथील असून त्याचे वय 64 आहे. त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. रुग्णाला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 499 सापडले आहेत. यापैकी बरे झालेले रुग्ण 364 तर मृत्यू-24 झाले आहेत. एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 111+1 आहेत.