रत्नागिरी:- मागील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात मध्यम तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
मागील दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. हवेतील आर्द्रता देखील वाढली होती. गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्यानंतर आणखी उकाडा वाढला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.