जिल्ह्यातील 45 दरडग्रस्त गावांचा तज्ञांकडून अभ्यास 

भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे चार गटात वर्गवारी

रत्नागिरी:- जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे दरडग्रस्त ४५ गावांचा अभ्यास करण्यात आला. भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे उच्च प्रवणतेनुसार चार गटात वर्गवारी करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये पूर, दरडी कोसळणे, भेगा जाणे, जमीन खचणे यासारखे प्रकार घडत आहेत. त्या ठिकाणी वेळीच उपाययोजना करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून ४५ गावांचा अभ्यास करण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तेथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुचविण्यात आलेल्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबधित यंत्रणांना कळविण्यात आले आहे. या यादी व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यातील भूस्खलन, दरड कोसळणे यामुळे धोकादायक असलेल्या गावांचे सर्वेक्षण करण्याबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथकाला यांना कळविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे व कोणत्याही प्रकारे जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तहसिलदार यांनी इंन्सीडंट कमांडर या नात्याने आवश्यक ते आदेश काढावेत अशा सूचना देण्यात आल्या. भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे उच्च प्रवणतेनुसार चार गटात वर्गवारी करण्यात आली. त्यात वर्ग १ जास्त धोकादायक गावांमध्य पाजपंढरी, उंबरवाडी, पायरवाडी (शेल्डी), गोवळकोट, ताम्हाणे, मुसळेवाडी (खोरनिनको) यांचा समावेश आहे. वर्ग २ जास्त ते मध्यम धोकादायक गांवांचा असून त्यात कळंबट (राजपूरेवाडी, झिमणेवाडी), देसाईवाडी (मांजरे), साठरे (ब्राम्हणवाडी), धोपेश्वर (खांदेवाडी) आहे. वर्ग ३ मध्ये धोकादायक गावे असून त्यात बहिरेवाडी (पंदेरी), लोकरण, हर्णे (राजेवाडी), धाकटीवाडी (आंबवली खु), तेलीवाडी (कर्दे), कडूवाडी(आसूद), मोरेवाडी, शिगवणवाडी, बौध्दवाडी (कोतवली), गण्याचा टोक, चिकटेवाडी, मोरेवाडी (जामगे), कोसमवाडी (मांडवे), कुडली, काजोळकरवाडी(पोसरी), नायतवाडी, तिवरे, आंबेरकरवाडी (कोळंबे), देवळे, शेलारवाडी(बेलारी बु.), मानसकोंड (फेपटेवाडी व किंजळवाडी), कातुर्डी, मधलीवाडी (नारडुवे जोगळेकरवाडी), गवळीवाडी, भोईवाडी (आगरनरळ), जांभारी, साईबाबानगर (खोरनिनको), दिवळीवाडी, गुरववाडी (हर्दखळे), शिवणे बु.(ता. राजापूर) या गावांचा समावेश आहे. वर्ग ४ कमी धोकादायक गावांमध्ये निवेवाडी(खोतवाडी), गवळीवाडी, गोमाणेवाडी (शेंबवणे), मालदेवाडी, कुरंग (गुरववाडी व मधलीवाडी) यांचा समावेश आहे.