2009 उमेदवार तर 4 लाख 59 हजार मतदार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींमध्ये आज शुक्रवारी (ता. 15) मतदान प्रक्रिया होणार आहे. 2009 उमेदवारांचे भवितव्य 4 लाख 59 हजार 121 मतदार ठरवणार असून मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उद्या मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांवर मतदान यंत्रे पोचवण्यासाठी प्रशासनाकडून एसटी महामंडळाचे सहकार्य घेण्यात आले. सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्याच्या ठिकाणी कार्यवाही सुरु होती. मतदारांच्या याद्यांसह मतदान यंत्रे त्यासाठी आवश्यक यंत्रणा सोबत घेऊन केंद्रांवरी अधिकारी, कर्मचारी रवाना होत होते. जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींमध्ये 914 प्रभाग असून 986 केंद्रांवर मतदान होणार आहे. 4 लाख 59 हजार 121 एकुण मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात 2 लाख 37 हजार 498 महिला तर 2 लाख 21 हजार 613 पुरुष मतदार आहेत. दहा इतर 10 मतदार आहेत. मत प्रक्रियेसाठी 223 झोनल अधिकारी, 1 हजार 125 केंद्राध्यक्ष, 3 हजार 365 मतदान अधिकारी, 1 हजार 4 पोलीस आणि 1 हजार 4 शिपाई असे 6 हजार 721 एकुण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था केली गेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर कोरोनाशी निगडीत निकषांचे पालन करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांनी काय करावे याबाबत सायंकाळपर्यंत प्रशासन संभ्रमात होते.