रत्नागिरी पुरातत्व विभाग ; अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव
रत्नागिरी:- कोकणात अश्मयुगीन संस्कृतिचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण अधोरेखित करणाऱी कातळशिल्प लवकरच राज्य संरक्षित होणार आहेत. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी पुरातत्व विभाने शासनानाला सादर केला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे अश्मयुगी संस्कृतीच्या या ठेव्याला लवकरच राजाश्रय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लीप्स असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्टभागावर कोरलेली आहेत. ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्र किनार्या लगत सुमारे 300 कि. मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळुन येतात. कोकणातील या कातळावर अश्ययुगी संस्कृती रुजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणाऱ्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे त्यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पाच्या भोवती गूढकथा पण परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास त्यांचे संरक्षण आणि जतन होऊ शकते. म्हणून सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले आणि अजूनही सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
रत्नागिरी पुरातत्व विभागाने रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आठ कातळशिल्प राज्य संरक्षित करावी, यासाठी प्रस्ताव दिला आहे. यापूर्वीही प्रस्ताव गेला होता. मात्र त्याला मंजूरी मिळाली नव्हती. मात्र या आठ कातळशिल्पाना राज्य संरक्षित करण्यासाठीचा अंतिम अधिसूचनेसाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. लवकरच त्यावर निर्णय झाल्यास याबाबत संबंधित महसूल विभाग, ग्रामपंचयत आणि कातळशिल्प असलेल्या भागात हरकतीबाबत नोटीसा लावल्या जाणरा आहेत. मात्र अजून या अंतिम अधिसूचनेची प्रतिक्षा आहे.
या आठ कातळशिल्पांचा आहे समावेश
राज्य संरक्षित करण्यात येणाऱ्या बारसू, भगवतीनगर, चवेल, देवीहसोळ, कशेडी, कातळगाव, उक्षी, वाडारुट या रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या आठ ठिकाणच्या कातळशिल्पांना राजाश्रय मिळणार आहे.