रत्नागिरीः– जिल्ह्यातील सात पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली असून त्यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. राज्यातील ५३९ पोलीस उपनिरीक्षकांना एकाचवेळी गृह विभागाने बढती दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक सौ.सुप्रिया बंगडे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कोकण विभागातच बदली झाली आहे. तर राजेश पन्हाळे यांची नागरी हक्क संरक्षण, जयश्री भोमकर,अश्विनी पाटील यांची कोल्हापूर येथे सागर चव्हाण यांची मिरा भाइर्दर यांची सोमनाथ कदम यांची गडचिरोली, महादेव म्हस्के यांची कोकण विभागातच बढतीने बदली करण्यात आली आहे.
बढतीने बदली झालेल्या सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना तत्काळ नव्या नेमणूकीच्या ठिकाणी सोडण्यात यावेत असे आदेश गृह विभागाने दिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळालेल्या सात अधिकार्यांचे वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.