रत्नागिरी:- रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांची बदली झाली आहे. श्री. इंगळे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी नाशिक, कळवण येथील सदाशिव शरणाप्पा वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिपळूण डीवायएसपी नवनाथ ढवळे यांची बदली ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे झाली आहे.
सिंधुदुर्गतील सावंतवाडी डीवायएसपी शिवाजी मुळीक यांची जिल्हा जातपडताळणी प्रमाणपत्र समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर अकोला मुख्यालयात कार्यरत डिवायएसपी शिवाजी लहू (एस.एल.) पाटील यांची रत्नागिरीचे पोलीस उपअधिक्षक (गृह) येथे बदली झाली आहे.तर खेडचे डीवायएसपी प्रवीण पाटील यांची बदली बसमत, जिल्हा हिंगोली येथे झाली आहे. पोलीस उपअधिक्षक (गृह) येथे बदली झालेले एस.एल.पाटील यापुर्वी पोलीस निरिक्षक म्हणून स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते.तब्बल दोन वेळा त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक, देवरुखचे पोलीस निरिक्षक म्हणून काम केले आहे. जिल्ह्याचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्याचा फायदा जिल्ह्याला होणार आहे.