रत्नागिरी:- जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी ग्रामस्थांना नियमित पुरवठा व्हावा या हेतूने जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत ‘स्वच्छ जल मे सुरक्षा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक नळपाणी योजनांच्या विहिरींचे जिओ टॅगींग करण्यात येणार आहे. या अभियानाचा पालमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभही करण्यात आला आहे.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी ग्रामस्थांना नियमित पुरवठा व्हावा या हेतुने 31 डिसेंबर 2022 पर्यंत स्वच्छ जल से सुरक्षा अभियान जिल्हामध्ये राबविण्यात येत आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून, सदरच्या अभियानाचा शुभारंभ उद्योगमंत्री व पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते कै.शामरावजी पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी आवार येथे करण्यात आले.
सदर अभियानाअंतर्गत 1)हर घर जल या मोबाईल पद्वारे अस्तित्वातील सर्व नळ पाणी पुरवठा योजना व रेट्रोफ़िटिंग करण्यात येणा-या योजनांच्या प्रमुख स्रोतांचे हर घर जल या मोबाईल अॅप द्वारे जीओटॅगिंग पुर्ण करणे. 2)स्वच्छ जल से सुरक्षा अभियाना दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनेच्या स्रोतांची मान्सुन पश्चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पुर्ण करण्यात येणार आहे. 3)अभियानांतर्गत एफटीके किटद्वारे व त्याच्या वापरासाठी महिलांना प्रशिक्षीत करुन एफटीके किटद्वारे नियमीत पाणी गुणवत्ता तपसाणी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हयातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे तसेच शाळा व अंगणवाडी यांना पुरविण्यात आलेल्या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनांचे जिओटॅगिंग करण्यात येणार असून, त्यांची प्रयोगशाळा तसेच एफटीके व्दारे रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येत आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानांतर्गत सहभाग घेऊन स्वच्छ जल सुरक्षा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी .परिक्षीत यादव, प्रकल्प संचालक (जि.ग्रा.वि.यं) नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्रवि) श्री.शेखर सावंत, माजी बांधकाम व आरोग्य सभापती श्री.बाबु म्हाप, कार्यकारी अभियंता श्रीम. मयुरी पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी जे.पी.जाधव, गट विकास अधिकारी पंचायत समिती राजापूर सुहास पंडित, गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर चौगुले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, विस्तार अधिकारी (पंचायत), रत्नागिरी तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक व जिल्हा परिषदेतील अधिकारी उपस्थित होते.