रत्नागिरी:- जिह्यातील ग्रामपंचायतस्तरावरील पहिला सौर प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे उभा राहत असून त्याचे काम अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर वेगाने कार्यवाही सुरु आहे. सुमारे 8 कोटी रुपये निधीतून उभा राहणाऱया या प्रकल्पाचे काम पुढील ऑगस्ट महिन्यात पूर्णत्वास जाउन विजनिर्मिती सुरू होणार आहे अशी अपेक्षा जि.प.प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनमधील राखीव निधीतून ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. जिह्यातील पहिला प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे होणार आहे. त्याचे काम नुकतेच काही महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. या प्रकल्पांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष पाठबळ लाभलेले आहे. त्यांया सहकार्याने जि.प.प्रशासनामार्फत हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. त्यामुळे हा सौरऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्याकडे आहे.
गोळप येथील 5 एकर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. त्यासाठी शासनाकडून 8 कोटां निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. मागील र्मा 2023 मध्ये या प्रकल्पो काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पी उभारणो काम आता अंतिम टप्प्यात पोहाले आहे. प्रकल्प ते सबस्टेशन हे काम सुरू असल्यो जि.प.प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रत्नागिरीतील ग्रामपांयतों पथदिपों येणारे वीजबिल शून्यावर आणण्यासाठी हा प्रकल्प साकारण्यी संकल्पना असल्यो जि.प.ााs मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी सांगितले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत या प्रकल्पो काम पूर्ण करण्या मानस जि.प.प्रशासनामार्फत ठेवण्यात आला आहे.
जि.प.ला ग्रा.पं.ाया पथदिपों वीजबिल दरवर्षी भागवण्यासाठी सुमारे 3 कोटां निधी लागतो. हा निधी शासनाकडून काही वेळेला वेळवर मिळत नाही. त्यामुळे ग्रामपांयतींसमोर अडाणी उभ्या राहतात. वीजबिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात येतात. त्यामुळे हा सौर पकल्प ग्रा.पं.साठी लाभदायी ठरणार आहे. जिह्यात 846 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) महिन्याचे वीजबिल 60 लाख रुपये येते. अनेकवेळा विलबिलांसाठी निधी न मिळाल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे स्थानिक जनतेची गैरसोय होते. पथदीप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची विजबिले भरण्यासाठी जिल्हा परिषदेचा सादिल निधीही तुटपुंजा पडतो. त्याला पर्याय म्हणून 1 मेगावॅट क्षमतेचे सौरप्रकल्प ठिकठिकाणी उभारण्याचा निर्णय जि.प.प्रशासनाने घेतला आहे.