रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कालावधी पुर्ण झाल्याने १० न्यायाधीशांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. बुधवारी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणावरील बदली झालेल्या न्यायधीशाना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम.क्यू. एस. एम. शेख यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.
यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. कयू. एस. एम. शेख आणि जिल्हा न्यायाधीश १ श्री. एल. डी. बिले यांनी मनोगत व्यक्त केले. बदली झालेल्या न्यायाधीशांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, श्री नितीन पाटील यांनी केले. बदली झालेले न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश (व.स्त) तथा सचिव आनंद सामंत यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांनी चार वर्षापेक्षा जास्त काळ रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कामकाज पाहिले. महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरण २०१८‚ १९ या कालावधीत निवड त्यांच्या कामकाजाच्या कालावधीत झाली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री जी. जी. इटकर यांचीही बदली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, नागपूर या ठिकाणी झाली असून, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर श्री. एन. सी. पवार यांची (बालापुर) अकोला, श्रीमती एस. एस. मटकर यांची यवतमाळ, श्रीमती आर. एस. गोसावी यांची (माजलगाव) बीड आणि श्रीमती पी. एस. गोवेकर यांची (परतूर) जालना येथे बदली झाली आहे. त्यामध्ये तालुक्यातील इतर ४ न्यायाधीशांच्या बदल्यांचा समावेश आहे.