रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत समस्यांचे निराकरण करणे, विद्यार्थ्यांना विविध शासकीय अधिकार्यांचे मार्गर्शन मिळावे यासाठी शासनातर्फे ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याने हा उपक्रम सर्वात प्रथम राबवला होता. शासनाने याची दखल घेत त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला होता. याची दखल शासनाने घेतली आहे. या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा उपक्रम राज्यस्तरावर राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकच वर्ष हा उपक्रम राबवण्यात आला होता. आता शासनाकडूनच हा उपक्रम राबण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत.