रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने त्यांची बदली प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी केली आहे.
नोव्हेंबर २००१ मध्ये त्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ वर पदोन्नती मिळाली. आरोग्य सेवेत असतानाच मार्च २०११ मध्ये जिल्हा शल्यचिक्तसक संवर्ग एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे कामकाज सांभाळून त्या २०१३-१५ या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या. २०१५ पासून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणूनही त्या अधूनमधून कार्यभार सांभाळत होत्या २०१७ पासून त्यांच्याकडे नियमित अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा कार्यभार आला. फेब्रुवारी २०१९ ते एप्रिल २०१९ पर्यंत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक पदावर कार्यरत होत्या. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाची अधिकृत जबाबदारी आली. गेल्या जुलै महिन्यात डॉ. संघमित्रा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपसंचालक (आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ) पदाची परीक्षाही उत्तीर्ण झाल्या, त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची आता येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी बदलीने नियुक्ती झाली आहे. या आधीचे अधीक्षक अमोद गढीकर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. फुलेंची नियुक्ती झाली