जिल्हा वैश्यवाणी समाज युवक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौरभ मलूष्टे यांची निवड

रत्नागिरी:- जिल्हा वैश्यवाणी समाज युवक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौरभ मलूष्टे यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या हस्ते आणि वैश्य वाणी समाज सेवाचे जिल्हाध्यक्ष विकास शेट्ये यांचा मार्गदर्शंखाली व वैश्यवाणी समाज युवक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर यांच्या उपस्थितीत सौरभ मलूष्टे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

 वैश्य वाणी समाजाच्या उन्नतीसाठीचा असलेला सौरभ मलूष्टे यांचा असलेला सहभाग तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक बांधिलकीचे जतन करत त्यांनी पार पाडत असलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज युवक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती देताना मलूष्टे यांच्यावर सर्वांसोबत संपूर्ण जिल्ह्यात संघटना निर्माण करण्यासाठी महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राधाकृष्ण मंदिरामध्ये आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बी एन पाटील यासह वैश्यवाणी समाज युवक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर,राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे विश्वस्त भाऊ भिंगार्डे,अध्यक्ष राजन मलुष्टे,उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू,सचिव मकरंद खातू खजिनदार राजेश रेडीज,कार्यकारिणी सदस्य ऍड सिद्धार्थ बेंडके, पत्रकार हेमंत वणजू,जान्हवी पाटील,प्रशांत पवार,चिपळूण वैश्य युवा समाज अध्यक्ष रोहन चौधरी,चिपळूण चे युवा उद्योजक श्री. सिद्धिराज पाथरे, श्री. प्राजेश खेडेकर,वैश्य युवा रत्नागिरी चे अभिज्ञ वणजू,मनोर दळी,सचिन केसरकर,मुकुल मलुष्टे,राजा बामणे,कुंतल खातू,सुनील बेंडखळे, गौतम बाष्टे,स्वप्नील दळी व सर्व वैश्य युवा संघटना रत्नागिरी चे सदस्य उपस्थित होते.