जिल्हा लॉकडॉऊनबाबत लवकरच निर्णय: पालकमंत्री 

रत्नागिरी:- राज्यात लॉकडाउन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. त्या निर्णयाला अनुसरून दोन दिवसात जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. लसीचा गोंधळ टाळण्यासाठी आम्ही नियोजन करीत आहे. आता 45 वर्षावरील लोकांना 4 लाख 37 हजार डोसची गरज आहे. त्याअनुषंगाने आम्ही नियोजन करीत आहोत, अशी माहिती पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आदी उपस्थित होते. 

श्री. परब म्हणाले, जिल्हाधिकारी आज कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. तिसर्‍या लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर  उपाययोजना करण्याच्या सूचना केले. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने याबाबत ही यंत्रणा सज्ज ठेऊन त्यांच्यासाठी छोटी कोविड सेंटर तयार केले जात आहेत. वादळसंदर्भात योग्यती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही केल्या. जिल्हयात 4 हजार 814 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आयसीयू मध्ये 217 बाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याला 5 हजार 200 रेमडिसिव्हर इंजेक्शन आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 17 हजार लसीकरण झाले. यामध्ये 1 लाख 379 पहिला डोस  झाले आहे. तर 45 ते 60 या गटात 4 लाख 37 हजारची आवश्यकता आहे. ज्या लोकांचा दुसरा डोस राहिला आहे, त्यांना प्राध्यानने लस देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने तूर्तास 18 ते 44 वयोगगटाचे लसीकरणाला स्थगिती दिली आहे.

कोविड सेंटर, शेती विषयक बैठकही यावेळी झाल्या. चक्रीवादळ संदर्भात कोणत्या खबरदारी घ्यायची आणि कोणत्या उपाययोजना करायचे याविषयी नियोजन करण्यात आले आहे. चक्रीवादळ आल्यावर धावपळ करण्यापेक्षा ते येण्याआधी उपाययोजना केलेले चांगले. त्यामुळे आमची जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असल्याचे श्री. परब म्हणाले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातच खनिकर्म योजनेतून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाला.