रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांना केंद्र गृह खात्याकडून विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या गडचिरोली येथील खडतर सेवेसाठी त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्गे हे रत्नागिरीत येण्यापूर्वी गडचिरोली येथील नक्षलवादी भागात सेवेत होते. नक्षलवादी निर्मूलन मोहिमेत खूप मोठी कामगिरी केलेली आहे. नक्षलवादी भागात लोकांसाठी त्यांनी सामाजिक कार्य केलेले असून तेथील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण, त्याचप्रमाणे येथे बहुउद्देशीय इमारत यांनी लोकसहभागातून बांधलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल केंद्राच्या गृह विभागाने घेतली असून केंद्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विशेष सेवा पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.