रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद भवनात अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यकमांतर्गंत सुमारे 62 लाख 64 हजाराच्या निधीतून सौर वीज निर्मीती यंत्रणा उभारण्याच्या कार्यवाही गतीमान झाली आहे. जि.प.सह मंडणगड, गुहागर, चिपळूण व संगमेश्वर या चार पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतींसाठी देखील ‘रुफ टॉप नेट मिटरिंग’ सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उर्जा विकास कार्यकमातून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी एकूण 87 लाख 69 हजार 852 रुपयांच्या निधीला मंजूरी मिळालेली आहे. या कार्यालयातील खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा शासनाने सौर ऊर्जा निर्मितीला पाधान्य दिले आहे. जिल्हा परिषद इमारतीला वर्षाला सुमारे 2 लाख 19 हजार 832 युनिट वीजेची गरज लागते. पमुख अधिकारी, खातेपमुख, पदाधिकारी यांच्या केबीनमध्ये वातानुकुलित यंत्रणा, पंख्यांचा वापर सर्वाधिक होतो. त्यांचे वार्षिक वीज बिल सुमारे 30 लाखाहून अधिक येत असते. त्यासाठी सौरऊर्जा वीजनिर्मीतीला आता पाधान्य मिळणार आहे. जिल्हा परिषद भवनातील या यंत्रणेमुळे वीज बिलाच्या सुमारे 30 लाख 24 हजार रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.
या सौर वीजनिर्मितीतून जि.प.कार्यालयाला अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत होणार आहे. नेट मिटरिंग सिस्टीम या योजनेनुसार वीज तयार करुन ती महावितरणला विकता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पातून इमारतीच्या वरच्या छतावर सौर पॅनल लावली जातील. प्रकल्प राबवल्यानंतर त्याला अनुदानापोटी मेडाकडून रक्कमही मिळण्यास मदत होते. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतीवर बसविण्यात येणाऱया या यंत्रणेसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 च्या उर्जा विकास कार्यकमातंर्गंत सौर उपकरणे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार एकूण 87 लाख 69 हजार 852 रु. निधी मंजूर झाला आहे.
त्यामुळे उपलब्ध अनुदानातून जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली इमारतींवर ‘रुफ टाॅफ नेट मिटरींग’ सौर विद्युत संच बसविले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजुर झाला आहे. जि.प.च्या कृषी विभागाकडून या पकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.