जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कारांची यादी जाहीर

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शिक्षण विभागाकडून आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो. 2024-25 मधील पुरस्कारप्राप्त 18 शाळांची नावे मंगळवारी जाहीर केली. कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा अशा दोन गटांत प्रत्येक तालुक्याला दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

आदर्श शाळा निवड झालेल्या नावी घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला प्रशासक तथा मुख्य कार्यकरी अधिकारी परीक्षित यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एम.कासार, उपशिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते आदीं प्रमुख उपस्थिती होती. जाहीर झालेल्या पुरस्कारप्राप्त शाळांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे शाळांमध्ये दर्जा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पुरस्कारासाठी जिह्यातून शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करून पुरस्कारप्राप्त शाळा निवडण्यासाठी सभा घेण्यात आली. त्यामध्ये ही निवड केली. त्यात (अनुक्रमे कनिष्ठ, वरिष्ठ) मंडणगड तालुक्यात जि. प. प्राथमिक शाळा बाणकोट किल्ला उर्दू, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पारळ, दापोली- जि.प.प्राथ.मराठी शाळा शिवाजीनगर भोंजाळी, पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नं.1, खेड- प्राथमिक शाळा आंबवली, पूर्ण प्राथमिक शाळा भोस्ते नं.1, चिपळूण- प्राथमिक शाळा कुशिवडे शिगवणवाडी नं.2, पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द यीं निवड करण्यात आली आहे.

गुहागर- प्राथमिक शाळा पोरीसडा नं.3, पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर घरटवाडी नं.1. संगमेश्वर- प्राथमिक शाळा माभळे घडशीवाडी, प्राथमिक शाळा हातिव नं.1. रत्नागिरी- प्राथमिक शाळा शिवारआंबेरे नं.2, पूर्ण प्राथमिक शाळा भोके आंबेकरवाडी. लांजा- प्राथमिक शाळा ाााफेट नेमण, पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुवे नं.2. राजापूर- प्राथमिक शाळा मोसम नं.2, पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नं.5. यां समावेश आहे.