रत्नागिरी:- जिल्हाधिकार्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन बेकायदेशिरपणे लक्झरी बसमधून चाफे ते मुंबई अशी 6 प्रवाशांची वाहतुक करणार्या चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 22 मे रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास चाफे तिठा येथे करण्यात आली.
मनोहर शांताराम गायकर (43,रा.अडूर नागझरी, गुहागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील लक्झरी बसमधून प्रवाशांकडे ई पास नसताना तसेच प्रवाशांचा पल्सरेट, ऑक्सिजन लेवल इ.बाबी चेक न करता वाहतुक करत होता.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.