रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. शैलेश सुर्वे (गवळीवाडा) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव असून संबंधीत तरुणाच्या जागेचे प्रकरण प्रलंबित आहे आणि यातूनच गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची शक्यता आहे. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित पोलीस कर्मचारी आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन आत्महत्या करणाऱ्याला रोखल्याने अनर्थ टळला. तरुणाने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्याचा प्रयत्न केला याची माहिती घेण्याचे काम पोलीस यंत्रणा करत होती.