जागेच्या वादातून महिलेला मारहाण; मिरजोळेतील तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे येथे जमिन जागेच्या वादातून महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 12 जून रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.

वैष्णवी विजय लांजेकर,विजय शंकर लांजेकर,अतुल विजय लांजेकर (सर्व रा.मिरजोळे सुंदरनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पूर्वा राकेश शेलार (29, रा.मिरजोळे सुंदरनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार,हे सर्व शेजारी-शेजारी राहतात त्यांच्यात जमिन जागेवरुन वाद सुरु आहेत. शनिवारी लांजेकर कुटुंबियाने पूर्वा शेलार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा पूर्वा शेलार यांनी त्यांना याचा जाब विचारला असता त्याचा राग आल्याने लांजेकर कुटुंबियाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या घरात घूसून हातांच्या थापटांनी मारहाण व धक्काबुक्की केली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.