जागेचे कंपाऊंड तोडल्याप्रकरणी आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील भोके-आंबेकरवाडी येथे अनुसूचित जातीतील प्रौढाच्या जागेचे कंपाऊंड तोडून नुकसान केले. याप्रकरणी 8 जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 10 मे रोजी दुपारी 11.30 वा. सुमारास घडली.

सुधाकर विठोबा सुर्वे (रा. कुवारबाव, रत्नागिरी), साईश सुहास मयेकर (रा.मुरुगवाडा, रत्नागिरी ) व इतर 6 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात अनिलकुमार हरिश्चंद्र वेतोस्कर (रा. जयगड, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी वेतोस्कर यांच्या जागेत अनधिकृतपणे जाऊन कंपाऊंड तोडून नुकसान केले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.