रत्नागिरी:- शहराजवळील जाकिमिऱ्या येथील वृद्धाने भेंडीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश रघुनाथ शेट्ये (वय ६४, रा. जाकीमिऱ्या उपळेकरबाग, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) सायकाळी पावणेसातच्या सुमारास जाकिमिऱ्या उपळेकर बाग येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश यांना गेली दोन वर्षे मानसिक आजार होता. ते वेडाच्या भरात गडबडीने सांयकाळी घराबाहेर गेले होते. काही तरी पडल्याचा आवाज आल्याने खबर देणार यांनी घराच्या मागील बाजूस जाऊन पाहिले असता सुरेश शेट्ये यांनी भेंडीच्या झाडाला नायलॉनच्या दोरी झाडाच्या फांदीला बांधून गळफास घेतल्याचे आढळले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.