जाकादेवी येथील विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी येथील विवाहितेने अज्ञात कारणातून बाजूच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. महिमा कैलास सोनावणे (२३, मूळ रा. पुणे, सध्या रा. जाकादेवी, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

ती पती आणि मुलासह जाकादेवी येथे रहात होती. शुक्रवारी पहाटे ती घरात कोठेही दिसून न आल्याने तिच्या पतीने तिचा आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा घराजवळच्याच विहिरीत तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.