जळाऊ लाकडे, फणसाच्या झाडाला आग लागून नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

खेड:- तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभागातील भेलसई -रोहिदासवाडी येथील घराच्या कंपाऊंडमधील जळाऊ लाकडे, बांबूचे बेट, फणसाच्या झाडाला आग लावून 55 हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील मारूती कदम (रा. भेलसई-रोहिदासवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत रामदास कदम यांनी तक्रार दाखल केली आहे. राग मनात धरून आग लावून 55 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.