रत्नागिरी:- शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत एकूण ५५० मीटर अंतरातील जलवाहिन्या टाकण्याच्या कामासाठी कोलकत्ता येथून मागवण्यात आलेले पाईप रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे रखडलेले काम वेगाने पुर्ण होणार आहे.
रत्नागिरी नगर पालिकेकडून या जलवाहिनीचे काम पुर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला हे काम पुर्ण होण्यासाठी शिवसेनाया पदाधिकार्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. न.प. हद्दीत शहरवासियांना शीळ धरणातील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे अजूनही एकदिवस आड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे दमदार पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.
पण त्यापूर्वी शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सद्या प्रशासनी जोरदार धडपड सुरू आहे. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. हे एकूण ५५० मीटर जलवाहिनीचे काम शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुरू आहे. त्यासाठी नवीन पाईपलाईन कलकत्ता येथून उपलब्ध झालेले आहेत. जलवाहिनी टाकण्याया कामाने गती घेतलेली आहे.