रत्नागिरी:- उन्हाळ्यात भेडसावणार्या पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार योजना वादग्रस्त ठरली असताना गुंडाळलेल्या या योजनेत रखडलेल्या कामांना मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. कोकणात राबविण्यात येणार्या या कार्यक्रमामुळे जलयुक्त शिवारात रखडलेली आणि न झालेली कामे त्यामुळे मार्गी लागणार आहे.
गेल्या 30-40 वर्षांत करण्यात आलेल्या काही सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती आवश्यक होती. त्यासाठी निधीची मागणी केली जात असे. विशेषत: शिवकालीन, पेशवेकालीन योजना दुरुस्तीअभावी उपयोगात आणल्या जात नव्हत्या. त्याचाही या योजनेत समावेश
आहे.
कालव्यावरील दुरुस्तीसाठी ही योजना असणार नाही तर उभारलेल्या प्रकल्पाच्या दुरस्तीसाठी निधी देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत केवळ 100 हेक्टपर्यंतची कामे हाती घेतली जात. पण या क्षेत्रात पूर्वी करण्यात आलेली कामे आणि त्याची देयक प्रलंबित असल्याने नवीन कामे होण्याची शक्यता कमी होती आहे. तरीही दुरुस्तीच्या योजना जलसंवर्धन योजनेत समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. त्यासाठी नव्याने जलयुक्तच्या पुढच्या टप्प्यातील सिंचन दुरुस्तीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला
आहे.