रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ येथे कारने ॲक्टीव्हा दुचाकीला धडक दिल्याने महिला जखमी झाली. अपघाताची ही घटना 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिन्मय अतुल पित्रे (26, बालाजी मंगल कार्यालयाजवळ, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्मय पित्रे हा आपल्या ताब्यातील कार (एमएच 08 ए एन 2652) घेऊन नाचणे शांतीनगर वरुन मिरकरवाडाकडे जात होता. जयस्तंभ येथे आला असता ऍक्टीव्हावरुन जाणाऱया अमृता अशोक भाटकर (24, सोमेश्वर, नागवेकरवाडी, रत्नागिरी) यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात अमृता या जखमी झाल्या. या अपघाताची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कार चालक चिन्मय पित्रे याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.