जयगड येथे खाडीत पडून खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथे बोटीवरुन तोल गेल्याने खाडीत पडून खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. घडली. शिवदयाल मनशाराम रायदास (26, रा.कच्छिनखेडा उन्नव, उत्तरप्रदेश) असे बुडून मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे.

गुरुवार 5 सप्टेंबर रोजी दारुच्या नशेत तो बोटीच्या पेरच्यावर बसलेला होता. तेव्हा त्याचा तोल जाउन तो जयगड खाडीत पडून दिसेनासा झाला. त्याचे सहकारी त्याचा शोध घेत असताना जयगड साखर मोहल्ला येथील खाडीच्या पाण्यात सायंकाळी 7.30 वा. त्याचा मृतदेह पाण्यावर उपड्या स्थितीत तरंगताना दिसून आला. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे