जयगड जेटीवर दोन दुचाकिंमध्ये अपघात; दोघे स्वार जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील जेटीवर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. जयगड पोलिस ठाण्यात स्वारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरमवीर वर्मा (रा. जेएसडब्ल्यू मच्छीमार सोसायटीच्या बाजूला. मुळ ः परगना कोलकत्ता राज्य वेस्ट बंगाल) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास जयगड ते जयगड जेटी जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय रमाकांत सुर्वे (वय ५१, रा. नांदिवडे, अंबुवाडी रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीडी ९५८५) घेऊन अंबुवाडी ते जयगड जेटी असे जात असताना जेटीवरील वळणावर उतारात आले असता मागून येणारी दुचाकी (क्र. एमएच-०९ ईटी १७२०) वरिल संशयित स्वार धरमवीर याने दुचाकी निष्काळजीपणे चालवून संजय सुर्वे यांच्या दुचाकीला जोरदार मागून धडक दिली. या अपघातात दोघे जखमी झाले तर दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी संजय सुर्वे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.