दापोली:-दापोली तालुक्यातील आसूद येथील एका महिलेला जमिनीच्या वादातून डोक्याचे केस पकडून दगडावर आपटुन जखमी व मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा च्या सुमारास घडली आहे.
याबाबत दापोली पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता प्रभाकर येन्द्रे (यद्रेवाडी, दापोली) व रमेश तापजी माने हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यांच्यामध्ये काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. दरम्यान 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वा प्राजक्ता येद्रे यांच्या राहत्या घरी जमिनीच्या वरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी फिर्यादी प्राजक्ता येद्रे यांनी ही जमीन आमची आहे असे म्हटले असता याचा राग आल्याने रमेश माने याने त्यांचे केस पकडून तिचे डोके दगडावर आपटले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाली त्याचवेळी प्राजक्ता यांचा भाऊ अमित हा सोडवण्यासाठी गेला असता त्यालासुद्धा संशयित आरोपी रमेश माने त्याची पत्नी शुभांगी माने, मुलगा आकाश माने अनिकेत माने यांनी मारहाण केली असून प्राजक्ता येन्द्रे यांच्या फिर्यादीवरून वरील संशयित चौघांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गोरे हे करीत आहेत.