जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड:- खेड-दापोली मार्गावरील नारिंगीनजीक बुधवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकी अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या अमोल बाबू चव्हाण (२५, रा. कर्नाटक) या दुचाकीस्वाराचा डेरवण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अन्य जखमी सहकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल बाबू चव्हाण व विनोद बाबू चव्हाण हे दोघेजण दुचाकीने प्रवास करत असताना नारिगीजवळ टॅक्टरने धडक दिली. यात दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याने रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असतानाच अमोल चव्हाणचा गुरुवारी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

अपघातप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल काकरण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे अपघाताबाबतचा अधिक तपशील अजूनही उपलब्ध होवू शकला नाही.