चोरी झालेले साडेसात लाखांचे दागिने सापडले घरात

संगमेश्वर पोलिसांनी 24 तासाच्या आतच दागिने केले हस्तगत

संगमेश्वर:- संगमेश्वर- नावडी बाजारपेठेत झालेल्या घरफोडी प्रकरणातील चोरीचा छडा लावण्यात संगमेश्वर पोलिसाना 24 तासात यश आले आहे. दिवाळीचा सण आणि धामधूम असतानाही पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत छडा लावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावडी बाजारपेठेतील श्रुती ब्युटी पार्लर मध्ये दागिने आणि पैशांची चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीची फिर्याद वैशाली संजय रहाटे यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात दिली होती. वैशाली संजय रहाटे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये साडेसात लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे म्हटले आहे. यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, 2 पाटल्या, 6 बांगड्या, एकूण 18 तोळे सोने, 25 हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण 7 लाख 50 हजाराची चोरी झाली होती. या घटनेची नोंद मंगळवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती.

संगमेश्वर पोलिसांनी या घटनेच्या तपासाला गती दिली. घटनेसंदर्भात पोलिस अधीक्षकांनी दखल घेत संगमेश्वर पोलिस स्थानकाला भेट दिली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, डी वाय एस पी सदाशिव वाघमारे यांनी तपासाची दिशा ठरवत संगमेश्वर पोलिसाना मार्गदर्शन केले. संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे, शेलार, पोलिस अंमलदार पंदेरे, कामेरकर, जोयशी, बरगाळे, जाधव, आव्हाड, महिला पोलिस कॉन्स्टेबल कांबळे, मळेकर यांच्या पथकाने तपास करत अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या