रत्नागिरी:- दुकानात चोरी केल्याच्या संशयातून मिरकरवाडा येथे तरुणाला आधी हॉटेलमध्ये आणि नंतर दुकानाजवळ नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. तरुणाचे हात मागे बांधून कपडे काढून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
9 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. सलमान लियाकत कोतवडेकर (वय 25, रा.खडकमोहल्ला मिरकरवाडा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या इरफान अब्दुल लतीफ मस्तान ( वय 42) आणि मोबिन अब्दुल लतीफ मस्तान ( वय 35, रा. मधला मोहल्ला, मिरकरवाडा) अशी नावे आहेत. सलमान कोतवडेकर याने दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलीस स्थानकात भा. दं. वि. कलम 341, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
9 नोव्हेंबर रोजी सलमान कोतवडेकर हे हॉटेलमध्ये नाश्ता करीत असताना मोबिन मस्तान त्या ठिकाणी आले. भावाच्या दुकानात चोरी केल्याचा संशयातुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी इरफान मस्तान हे देखील आले. दोघांनी सलमान याला मारहाण केली. यानंतर दोघांनी सलमान याला ओढत दुकानजवळ नेत अंगावरील कपडे काढून हात पाठीमागे बांधून मारहाण केली. या मारहाण प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.