रत्नागिरी:- तालुक्यातील चवे येथे चिरे खाणीवरील कामावर न गेल्याच्या रागातून कामगाराला तेथील मुकादम त्याची पत्नी आणि मेव्हण्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवार 8 मार्च रोजी सकाळी 9 वा.घडली आहे.
गांधी दिलीप राठोड (26 मुळ रा.विजापूर कर्नाटक सध्या रा.चवे जयगड) असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गांधी राठोड हा चवे येथील चिरे खाणीवर चिरे काढण्याचे काम करतो. परंतू त्या दिवशी तो कामावर गेला नव्हता. याचा राग आल्याने चिरे खाणीवर कामकाज करुन घेणारा मुकादम धनसिंग भिमसिंग राठोड त्याची पत्नी आणि मेव्हण्याने हातांनी तसेच लाकडी दांडक्याने गांधी राठोडला मारहाण केली. यात त्याच्या अंगावर मारहाणीचे वळ उठल्याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली असून अद्याप याबाबत जयगड पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.