चिपळूण शहरात भरवस्तीत शिरली मगर; उडाला एकच गोंधळ 

रत्नागिरी:- मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चिपळूण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी वस्तीनजीक पोहचवले आहे. याच पुराच्या पाण्यातून शनिवारी संध्याकाळी मगर थेट नागरी वस्तीपर्यंत पोहचली. चिपळूणमध्ये गटारातून मगर राहत्या वस्तीपर्यंत आल्याने एकच खळबळ उडाली. 

 चिपळूण येथील फैयाज देसाई यांच्या घराशेजारी मगर आढळली. या घटनेची खबर तत्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पिंजऱ्यात जेरबंद केले. यांनतर मगरीला नदीत सोडून देण्यात आले. पावसाळ्यात मगर शहरात दिसणे हे नेहमीचेच झाले असून चिपळूण मगरींचे शहर झाले आहे.