चिपळूण:- चिपळूण रिक्टोली- इंदापूर येथील वृद्धेच्या खूनप्रकरणी एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पैशासाठी खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. प्रशांत प्रकाश शिंदे (वय ३०, रा. रिक्टोली- इंदापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने चोरलेल्या सोन्याच्या कुड्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
शिंदे यांचा मुलगा व मुलगी हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्या घरात एकट्याच रहात होत्या. खूनप्रकरणी पोलीसांना संशय होता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. गावातही तपास करत करत होते. दरम्यान, घाबरलेल्या प्रशांतने त्यांच्या समोरूनच पलायन केल्यामुळे त्याच्यावर संशय आला.
दोन दिवसांपूर्वी तो गावातील जंगलात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत पैशाची गरज असल्याने कानातील कुड्यांवर डोळा ठेऊन शिंदे यांने हा खून केल्याचे समोर आले आहे.