चिपळूण:- चिपळूण शहरातून दुचाकी व चारचाकी चोरणाऱ्या दोघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयितांनी चोरीची कबुली दिली आहे. संशयित हे १८ ते २० वयोगटातील आहेत. चैनीसाठी त्यांनी चोरी केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, शहर आणि उपनगरात मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरु होते. गोवळकोट रोड, खेड, शिवाजीनगर येथून दुचाकी व चारचाकी गायब झाल्या होत्या. गुगल कोड रोड येथील अब्दुल मजीद अब्दुल हमीद चौगुले यांनी आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दिली होती. गोगलकोट रोड येथील उमर चौगुले यांच्या अपार्टमेंटसमोर लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. खंड येथील पांडुरंग दौलत राजेशिर्के यांचे वाहनही दोन दिवसापूर्वी चोरीला गेले होते. त्यांनीही चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती. अपार्टमेंट समोरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी पेठमाप येथील अब्दुल रहमान फिरोज सय्यद व उक्ताड बायपास येथील अमान मुजफ्फर तांबे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यानी चोरीची कबुली दिली.