चिपळूणः– शहरातील बहादूरशेख नाका येथे 14 जानेवारी रोजी दुचाकी व टेम्पो यांच्यात अपघात होवून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी दुचाकीस्वारावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक नामदेव राठोड (28, यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या बाबतची फिर्याद पूर्वा अशोक पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक राठोड हा दुचाकीने खेर्डीहून चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता. तो समोरील एसटी बाजू काढत असताना मुंबईच्या दिशेने जणाऱ्या मालवाहू टेम्पोवर जोरदार धडकला. या अपघातात विवेक राठोड गंभीर जखमी झाल्याने यातच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.